युद्धाचा खेळ!

(तोताराम विठ्ठलपंतांशी हितगुज करत असतानाच धावत-पळत चंपक अवतरतो आणि पुढे सुरू..)तोताराम : चंपकराव, डोळे लाल दिसतात तुमचे. वर्ल्डकपची ओपनिंग मॅच धडतपडतच मिळालेली दिसतेय..चंपक : अहो आजचं झालं मनासारखं. चांगलंच झालं, पुढचं महत्त्वाचं आहे. तोताराम : विठ्ठलपंत स्पीड पकडा. भारत-पाकिस्तान धर्मयुद्धाचा …

(तोताराम विठ्ठलपंतांशी हितगुज करत असतानाच धावत-पळत चंपक अवतरतो आणि पुढे सुरू..)
तोताराम : चंपकराव, डोळे लाल दिसतात तुमचे. वर्ल्डकपची ओपनिंग मॅच धडतपडतच मिळालेली दिसतेय..
wc13चंपक : अहो आजचं झालं मनासारखं. चांगलंच झालं, पुढचं महत्त्वाचं आहे.
तोताराम : विठ्ठलपंत स्पीड पकडा. भारत-पाकिस्तान धर्मयुद्धाचा फैसला करायचाय तुम्हाला..
(लाल रंगाचे कार्ड हाती देऊन विठ्ठलपंत पिंजऱ्यात परततात.)
तोताराम : लाल रंग शौर्याचा. विजय भारताचाच आहे.
चंपक : एक नंबर, भारी! चांगली जिरवली पाहिजे त्यांची. शांतीच्या बाता मारून पाठून हल्ले करतात.
तोताराम : चंपकराव, ते युद्ध, हा खेळ-गल्लत करू नका. युनिस खान आणि मिसबाह उल हक यांना थोपवावे लागेल. ट्वेन्टी-२० विश्वचषक हुकवणाऱ्या त्या फटक्याची परतफेड मिसबाह करू शकतो. आफ्रिदीबाबत नेपच्यून ग्रहावरचे ज्योतिषीच सांगू शकतात. पाकिस्तानचे गोलंदाज नवे आहेत, पण छावे आहेत. त्यांना सहज चोपून काढू, हा फाजील आत्मविश्वास नको. एक बरं झालंय. धोनी आणि मिसबाह या ‘कुल’ माणसांनी युद्धज्वर खाली आणलाय.
चंपक : आपलं कोण खेळेल?
तोताराम : चंपकराव तुम्ही मनाने अ‍ॅडलेडलाच पोहोचलात राव. फलंदाज आहेत खूप, पण एकाला तेंडुलकर व्हावे लागेल. पहिल्या अध्र्या तासात तो कानात गुंजणारा निनाद ऐकायचा फक्त, पण डोक्यात जाऊ द्यायचा नाही. विराटला शतक झाल्यावर ‘फ्लाइंग किस’ द्यायला अनुष्कावहिनी नाहीत. पण जग व्हच्र्युअल झालंय, व्हॅलेन्टाइनचा किस बी लेटेड देईल.. आणि काही दगाफटका झालाच तर धोनीदादा आहेतच.
चंपक : येस्स, पळतो मी.
तोताराम : चंपकराव, बोहनी केलीत.. जय हो! खेळाडू फिट राहण्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर हनुमानचालिसा पठणाचं विसरू नका!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cricket war

ताज्या बातम्या