मेलबर्नची भीती नाही!

‘‘ऑस्र्ट्लियाविरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना आणि तोही त्यांच्याच मैदानात असला तरी आमच्यावर दडपण नाही.

‘‘ऑस्र्ट्लियाविरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना आणि तोही त्यांच्याच मैदानात असला तरी आमच्यावर दडपण नाही. मेलबर्नवर साधारण एक लाख प्रेक्षक असतील आणि त्यापैकी बहुतांशी ऑस्ट्रेलियाचे असतील, त्याचबरोबर मैदानाचे आकारमानही मोठे असले तरी आम्हाला याबाबत कसलीच भीती वाटत नाही,’’ असे मत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने व्यक्त केले आहे.
‘‘मेलबर्नमध्ये आम्ही गेली काही वर्षे खेळलो नाही. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही चांगला खेळ करत आहोत, त्यामध्येच सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न असे,’’ असे साऊदी म्हणाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New zealand not worried about melbourn cricket ground crowd