भारतीय संघातील क्रिकेटपटूंनी वर्ल्डकपदरम्यान हॉटेलमध्ये पत्नी किंवा गर्लफ्रेंडला सोबत ठेवण्याची केलेली मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुन्हा एकदा फेटाळली. पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर क्रिकेटपटूंनी बीसीसीआयकडे ही मागणी केली होती. मात्र, बीसीसीआयने ती पुन्हा फेटाळल्यामुळे क्रिकेटपटूंच्या पदरी निराशा आली आहे.
वर्ल्डकप सुरू होण्याआधी बीसीसीआयने कोणत्याही क्रिकेटपटूला त्याची पत्नी किंवा गर्लफ्रेंडला सोबत नेण्यास बंदी घातली होती. त्याच भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. खेळाडूंनी सर्वात आधी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही बीसीसीआयने सर्वच खेळाडूंना दिला आहे. भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये गेल्यावरच खेळाडूंच्या या मागणीवर फेरविचार केला जाईल, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले.
पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर क्रिकेटपटूंनी बीसीसीआयकडे पुन्हा एकदा पत्नी किंवा गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये सोबत ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, आपल्या निर्णयात कोणताही बदल करण्यास बीसीसीआयने नकार दिला आहे.