रहाणेकडे सर्वात चांगले तंत्र -वॉन

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनवर भारताच्या अजिंक्य रहाणेने आपल्या फलंदाजीची मोहिनी घातली आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनवर भारताच्या अजिंक्य रहाणेने आपल्या फलंदाजीची मोहिनी घातली आहे. भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात चांगले तंत्र हे अजिंक्य रहाणेकडे आहे, असे मत वॉनने व्यक्त केले आहे.
‘‘भारताकडे चांगल्या दर्जाचे फलंदाज आहेत.  भारतीय संघातील सारेच फलंदाज युवा असले तरी मला अजिंक्यची फलंदाजी पाहायला आवडते. भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात चांगले तंत्र अजिंक्यकडे पाहायला मिळते,’’ असे वॉन म्हणाला.
रहाणेच्या फलंदाजीमध्ये खास काय आहे, असे विचारल्यावर वॉन म्हणाला की, ‘‘ रहाणे जेव्हा फलंदाजीसाठी क्रीझमध्ये उभा राहतो, तेव्हा त्याचा डाव पाय जास्त वाकडा नसतो. त्यामुळेच त्याला फलंदाजी करताना योग्य समतोल राखता येतो. ’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rahane has best technique among indian batsmen say vaughan