(अगदी धावतपळत चंपक तोतारामसमोर येऊन
उभा राहतो)
तोताराम : अरे अगदी ‘दत्त’ म्हणून हजर झालात!
चंपक : आज लवकर मोकळं करा. अजिबात वेळ नाही. पुन्हा कचेरीत जायचंय.
तोताराम : जशी तुमची मर्जी.
चंपक : दक्षिण आफ्रिकेने सीसॉ जपला. मोठय़ा पराभवानंतर मोठा विजय.
तोताराम : साहजिक होतं ते.
(विठ्ठलपंत निळ्या रंगाचं कार्ड हाती देतात)
तोताराम : .हली हे त्रिकूट चर्चेत राहील. आपल्या सगळ्याच बॉलर्ससाठी हा झिम्बाब्वेचा संघ नवीन आहे. जडेजाला हिरो होण्याची सुवर्णसंधी आहे. ब्रेंडन टेलर आणि शॉन विल्यम्स यांना वेळीच थोपवायला हवं. या सामन्यात जिंकलो, हरलो तरी बाद फेरीत आपण जाणारच आहोत. पण म्हणूनच सर्वोत्तम तयारी आणि जोशासह खेळायला हवं. अफगाणिस्तानने स्पर्धेत फक्त अमिरातीला नमवलंय, पण आता त्यांच्यासाठी विजयाचा किरण दिसतो आहे. बांगलादेशविरुद्ध पराभूत झाल्यावर इंग्लंड टीकेच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे. डिवचलेल्या इंग्लंडला अफगाणिस्तानला चिरडायचं आहे. पण ते आंतरराष्ट्रीय संघासारखे खेळले तरच हे शक्य होईल. घरी जाता जाता विक्रम नावावर करण्याची संधी इंग्लंडच्या प्रत्येक खेळाडूला आहे.
चंपक : बघूया काय होतंय ते. आता सटकतो.