विराटने मोडला सचिनचा विक्रम!

टीम इंडियाचा युवा फलंदाज विराट कोहलीने अॅडलेड ओव्हल मैदानावर शतक ठोकून नवा इतिहास रचला आहे.

टीम इंडियाचा युवा फलंदाज विराट कोहलीने अॅडलेड ओव्हल मैदानावर शतक ठोकून नवा इतिहास रचला आहे. विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात शतक ठोकणारा विराट कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आजवर पाच वेळा आमने-सामने आले आहेत. या पाचही सामन्यात भारताने वर्चस्व गाजवले असले तरी, आजवर एकाही भारतीय फलंदाजाने विश्वचषक स्पर्धेतील पाकविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले नव्हते. याआधी २००३ च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध सचिन तेंडुलकरने ९८ धावांची खेळी साकारली होती. मात्र, आता अॅडलेडवरील सामन्यात १०७ धावा ठोकून विराट कोहलीला विश्वचषकातील पाकविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक धावांची वैयक्तिक खेळी साकारण्याचा बहुमान मिळाला आहे.
फोटो गॅलरी: भारत-पाकिस्तान घमासान!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Virat kohli breaks sachin tendulkars record