विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील सलग दोन पराभवांनंतर पाकिस्तानी संघावर जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार वासिम अक्रमनेही पुढील सामना जिंका अन्यथा दुसऱ्या दिवशीचे पहाटेचे विमान पकडून घरी परता, असा इशारा संघाला दिला आहे.
‘‘मैदानावर आणि टीव्हीवर मोठय़ा आशेने खेळ पाहणाऱ्या क्रिकेटरसिकांच्या भावनांची त्यांनी कदर करायला हवी,’’ असे अक्रम म्हणाला.
पाच गोलंदाजांसह न खेळण्याच्या कर्णधार मिसबाह-उल-हक आणि संघ व्यवस्थापनाच्या भूमिकेवर अक्रमने टीका केली. ‘‘पाकिस्तानी संघ एक अतिरिक्त फलंदाज खेळवत आहे आणि अद्याप आम्ही धावांचा पाठलाग यशस्वीपणे करू शकलेलो नाही. हे निराशाजनक आहे. संघाची योग्य बांधणी करायला हवी,’’ असे अक्रम म्हणाला.