ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या धर्तीवर सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या निकालांची भविष्यवाणी करणारा व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेला बुकींचा मॅसेज अखेर खोटा ठरला. टीम इंडियाने रविवारी दक्षिण आफ्रिकेवर १३० धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला. या सामन्याचा निकाल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागेल असे भाकित व्हॉट्सअॅप व्हायरल झालेल्या मॅसेजमध्ये करण्यात आले होते. मात्र, टीम इंडियाने अशाप्रकारच्या कोणत्याही भाकीतांचा दबाव निर्माण न होऊ देता आपला नैसर्गिक खेळ केला आणि सामना जिंकून बुकींचे भाकीत खोटे ठरवले. टीम इंडियाच्या विजयाने या मॅसेजच्या अचूक भविष्यवाणीमुळे सुरू झालेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
विश्वचषक स्पर्धेत झालेल्या पहिल्या नऊ सामन्यांचे निकाल हे मॅसेजमध्ये करण्यात आलेल्या भविष्यवाणीशी अगदी मिळतेजुळते होते. त्यामुळे संपूर्ण विश्वचषक स्पर्धेवर सर्वत्र संशयाच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान या विश्वचषक स्पर्धेतील दहाव्या सामन्यात वेस्ट इंडिजने विजय साजरा केला आणि या मॅसेजचे खोटारडेपण पहिल्यांना समोर आले. या सामन्यात पाकिस्तानच्या बाजूने निकाल लागण्याची भविष्यवाणी मॅसेजमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या निकालाने बुकींच्या आडाख्यांना चांगलाच धक्का दिला.

व्हॉट्सअॅपवर व्हायरल मॅसेज-

World Cup 2015 fixed winners!

14/2: Nz vs sl (nz)
Aus vs eng (aus)

15/2: Rsa vs zim (rsa)
Ind vs pak (Ind)

16/2: Ire vs Wi (Ire)

17/2: Nz vs sco (Nz)

18/2: Ban vs afg (Ban)

19/2: Uae vs zim (Zim)

20/2: Nz vs Eng (Nz)

21/2: Pak vs Wi (Pak)
Aus vs Ban (Aus)

22/2: Afg vs Sl (Sl)
Ind vs Rsa (Rsa)
23/2: Eng vs Sco (Eng)

24/2: Wi vs Zim (Wi)

25/2: Ire vs Uae (Ire)

26/2: Afg vs Sco (Afg)
Ban vs Srl (Srl)

27/2: Rsa vs Wi (Rsa)

28/2: Nz vs Aus (Nz)
Ind vs Uae (Ind)

1/3: Eng vs Srl (Eng)
Pak vs Zim (Pak)

2/3: Ire vs Rsa (Rsa)

4/3: Pak vs Uae (Uae)
Aus vs Afg (Aus)

5/3: Ban vs Sco (Ban)

6/3: Ind vs Wi (Ind)

7/3: Pak vs Rsa (Rsa)
Ire vs Zim (Zim)

8/3: Nz vs Afg (Nz)
Aus vs Srl (Aus)

9/3: Eng vs Ban (Eng)

10/3: Ind vs Ire (Ind)

11/3: Srl vs Sco (Srl)

12/3: Rsa vs Uae (Rsa)

13/3: Nz vs Ban (Nz)
Afg vs Eng (Eng)

14/3: Ind vs Zim (Zim)
Aus vs Sco (Aus)

15/3: Wi vs Uae (Wi)
Ire vs Pak (Ire)

QF 1: Nz vs Ind (Ind)
QF 2: Aus vs Zim (Aus)
QF 3: Eng vs Rsa (Rsa)
QF 4: Srl vs Pak (Srl)

SF 1: Aus vs Ind (Aus)
SF 2: Srl vs Rsa (Rsa)

Final: Aus vs Rsa (Rsa)