Operation Sindoor अंतर्गत गुरुवारी सकाळच्या कारवाईत भारताने पाकिस्तानात लाहोरजवळील हवाई हल्लाविरोधी यंत्रणा उद्ध्वस्त केली, असं संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात ९ मे रोजी म्हटलं होतं. भारतीय लष्कराच्या या कारवाईमुळे पाकिस्तानच्या हवाई कारवाया मोठ्या प्रमाणावर थोपवून धरण्यास मदत झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारताने १९६५ साली लाहोरवर केलेल्या ऐतिहासिक हल्ल्याचा घेतलेला हा आढावा.