गेल्या काही काळात ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मुंबईतील एका ६४ वर्षीय वृद्ध महिलेला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करून २२.४० लाखांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्याने दिल्ली एटीएस अधिकारी असल्याचे भासवून तुरुंगवास आणि आर्थिक दंडाची भीती दाखवली. महिलेनं वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्स्फर केले. नंतर फसवणूक लक्षात येताच तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.