साप्ताहिक राशिभविष्य

aries
मेष( ११ ते १७ मे २०२५ )
मेष : संवाद जपून करा

१४ मे रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करत आहे. तुमच्या राशीला हा गुरू तिसरा असेल. हे वर्ष भाग्योदयाचे असेल. पौर्णिमा कालावधी उत्तम राहील. दिनांक १३, १४ हे संपूर्ण दोन दिवस १५ तारखेला दुपारपर्यंत असे अडीच दिवस चढउतारांचे आहेत. या दिवसांत जाणूनबुजून एखादी गोष्ट करायला जाऊ नका. नाही तर एखादी गोष्ट अंगलट येऊ शकते. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करू नका. कोणाशीही बोलताना संवाद जपून करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात संधी उपलब्ध होईल. नोकरदार वर्गाला प्रत्येक काम काळजीपूर्वक हाताळावे लागेल. आर्थिकदृष्ट्या अचानक धनलाभ होईल. राजकीय क्षेत्रात सध्या रस वाटणार नाही. धार्मिक गोष्टींची आवड राहील. कौटुंबिक वाद टाळा. मानसिकता जपा. आहाराचे पथ्य पाणी सांभाळा

शुभ दिनांक : ११, १६

महिलांसाठी : कोणावर अवलंबून राहू नका.

taurus
वृषभ( ११ ते १७ मे २०२५ )

वृषभ : शांतपणे मत मांडा

गुरू १४ मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल. हा गुरू तुमच्या राशीला दुसरा असेल. म्हणजेच धनस्थानातून या गुरूचे भ्रमण राहील आणि ते चांगले असेल. पौर्णिमा कालावधीत शांत राहा. षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. ज्या वेळी असे भ्रमण असते, त्या वेळी आपले मत मांडताना ते शांतपणे मांडणे योग्य राहील. या दिवसांत जपून पाऊल टाकणे हेच शहाणपण असते. काही गोष्टी म्हणण्यापेक्षा सर्वच गोष्टी न पटणाऱ्या तुमच्यासमोर येतात. त्या वेळी स्पष्ट प्रतिक्रिया दिल्यामुळे त्रास होतो, त्यामुळे आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. व्यवसायातील कोणताही व्यवहार करताना भावनिक होऊ नका. व्यावहारिक राहा. म्हणजे नुकसान होणार नाही. नोकरदार वर्गाला कामाचा व्याप वाढेल.

आर्थिकदृष्ट्या नियोजन करा. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा.

प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : १३, १४

महिलांसाठी : सकारात्मक विचार करा.

gemini
मिथुन( ११ ते १७ मे २०२५ )

मिथुन : सल्ला देणे टाळा

१४ मे रोजी गुरूचे भ्रमण तुमच्याच राशीतूनच होत आहे. हा गुरू तुमच्या राशीला पहिला असेल. हे भ्रमण सुखदायी असेल. पौर्णिमा कालावधी लाभाचा असेल. दिनांक १३, १४ हे दोन दिवस १५ तारखेला दुपारपर्यंत असे अडीच दिवस बेताचे राहतील. त्यामुळे या दिवसांत घाई करून निर्णय घेणे त्रासाचे राहील. इतरांना सल्ला देणे टाळा. कोणी काय करावे काय करू नये यासाठी सध्या वेळ घालवू नका. स्वत:साठी वेळ द्या. काही कामांना या दिवसांत उशीर होणार आहे हे गृहीत धरून चाला म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील आवक जावक वाढेल. नोकरदार वर्गाला कामात गुंतून राहावे लागेल. आर्थिकदृष्ट्या व्यवहार करताना काळजी घ्या. मुलांबाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील. जोडीदाराची साथ मिळेल. मानसिक ताण घेऊ नका. योग साधनेला महत्त्व द्या.

शुभ दिनांक : ११, १२

महिलांसाठी : काम करण्यापूर्वी कामाची पूर्ण तयारी करा.

Cancer
कर्क( ११ ते १७ मे २०२५ )

कर्क : अनुभव विसरू नका

१४ मे रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करत आहे. हा गुरू तुमच्या राशीला बारावा असेल. म्हणजेच व्ययस्थानातून भ्रमण करत आहे. तेव्हा धाडसी निर्णय घेणे टाळा. पौर्णिमा कालावधीत ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. १५ तारखेला दुपारनंतर दिनांक १६ व १७ हे संपूर्ण दोन दिवस असा अडीच दिवसांचा टप्पा पार करताना भान ठेवा. एखादी गोष्ट सहज होईल असे नाही. त्यासाठी कष्ट सोसावे लागणार आहेत हे लक्षात ठेवा. वेळेत काम होईल याची शक्यता कमी आहे. कोणतेही काम करताना मागील अनुभव विसरू नका. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात उलाढाल वाढेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. समाजसेवा करताना आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घ्या. घरगुती वातावरण चांगले राहील. उपासना फलद्रूप होईल. प्रकृती ठीक राहील.

शुभ दिनांक : १३, १४

महिलांसाठी : विचार करून बोला.

leo
सिंह( ११ ते १७ मे २०२५ )

सिंह : निर्णय यशस्वी होतील

१४ मे रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करत आहे. हा गुरू तुमच्या लाभस्थानातून प्रवेश करत आहे. म्हणजेच तुमच्या राशीला अकरावा गुरू असेल. हा लाभदायक ठरेल. पौर्णिमा कालावधी धडाडीचा असेल. या सप्ताहात सर्वच दिवस चांगले आहेत. कोणत्याही गोष्टीसाठी फार पळावे लागणार नाही. कमी वेळेत काम होईल. केलेले नियोजन फसणार नाही. कोणाबरोबर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. घेतलेले निर्णय यशस्वी होतील. व्यवसायात अपेक्षेपेक्षा फायदा चांगला होईल. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीचे प्रस्ताव येतील. खर्चाची बाजू सावरता येईल. सामाजिक माध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. मित्र-मैत्रिणींशी दुरावलेले संबंध चांगले होतील.

संततीसौख्य लाभेल.

घरगुती वातावरण चांगले राहील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : १६, १७

महिलांसाठी : मनोरंजनासाठी वेळ मिळेल.

gemini
कन्या( ११ ते १७ मे २०२५ )

कन्या : मनोकामना पूर्ण होईल

१४ मे रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करत आहे. हा गुरू तुमच्या राशीस दहावा येईल. हा दहावा गुरू तुम्हाला कामकाजात यश मिळवून देणार आहे. सप्ताहात पौर्णिमा धनस्थानातून होत आहे. ही चांगली असेल. बाकी दिवसही चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये वेळ कधी आणि कसा जातो तुम्हाला कळत नाही. कारण कामांमध्ये गुंतून राहणे हे तुमच्या राशीचे वैशिष्ट्य आहे, त्यामुळे स्वत:साठी वेळ द्यायला मिळत नाही. सध्या मात्र असे करू नका. तुमच्या मनोकामना पूर्ण होणाऱ्या आहेत. सध्या तुमच्या मनाला जे चांगले वाटते तेच करा. व्यवसायात आवक वाढेल.

नोकरदार वर्गाला कामात यश मिळेल.

आर्थिक लाभ होईल.

राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. नातेवाईकांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. भावंडांना मदत कराल.

आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.

शुभ दिनांक : ११, १२

महिलांसाठी : अनेक माध्यमातून यश मिळेल.

libra
तूळ( ११ ते १७ मे २०२५ )

तूळ : शुभकार्यास प्रारंभ

१४ मे २०२५ रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करत आहे. हा गुरू तुमच्या राशीस नववा असेल. म्हणजेच तुमच्या भाग्यस्थानात येईल आणि हे वर्ष खरंच भाग्योदयाचे असेल. सप्ताहातील पौर्णिमा तुमच्या राशीतूनच होत आहे. सर्व दिवसांचा कालावधी चांगला आहे. ज्या आठवड्यात सर्व दिवसांचा कालावधी चांगला असतो, या कालावधीत बरीच कामे पूर्ण होत असतात. आपल्या ध्यानीमनी नसतानासुद्धा चांगले प्रस्ताव येतात. सध्या सर्व गोष्टी मनासारख्या होणार आहेत. या कालावधीत शुभकार्यास प्रारंभ होईल. व्यवसायात नवीन आलेले प्रस्ताव स्वीकारावयास हरकत नाही. नोकरदार वर्गाच्या कामामध्ये यश मिळेल. आर्थिक चिंता मिटेल. कुटुंबातील वातावरण आनंदाचे असेल. जोडीदार मदत करेल. तरुण वर्गाचे विवाह ठरतील. मानसिकता चांगली राहील. प्रकृती साथ देईल.

शुभ दिनांक : १२, १३

महिलांसाठी : यशाचे शिखर गाठाल.

soc
वृश्‍चिक( ११ ते १७ मे २०२५ )

वृश्चिक : कामाला प्राधान्य द्या

१४ मे रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करत असून तो तुमच्या अष्टमस्थानात येईल. तुमच्या राशीला हा गुरू आठवा असेल. तेव्हा प्रकृतीविषयक काळजी घ्या. पौर्णिमा कालावधीत वादविवाद करू नका. दिनांक. ११, १२ हे दोन दिवस एखादे काम कमी करा, पण तोंडाची बडबड करू नका. त्यामुळे होणाऱ्या गोष्टींना खो घातल्यासारखे होईल आणि काम थांबून जाईल. गोड बोलण्याने बरेच काही साध्य होते हे सध्या विसरू नका. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये चांगल्या गोष्टींसाठी पाठपुरावा करावा लागणार नाही. कामाला प्राधान्य द्या. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात होणारा त्रास दूर होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. वैवाहिक जीवनात कुरबुरी कमी होतील.

आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा.

प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : १३, १४

महिलांसाठी : देवाण-घेवाण टाळा.

Sagi
धनु( ११ ते १७ मे २०२५ )

धनू : मोह आवरा

१४ मे रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करत आहे. हा गुरू तुमच्या सप्तम स्थानात येत आहे. हा तुमच्या राशीला गुरू सातवा असेल हे वर्ष अनुकूल जाईल. पौर्णिमा कालावधी लाभाची असेल. दिनांक १३, १४ हे संपूर्ण दोन दिवस १५ तारखेला दुपारपर्यंत असे अडीच दिवस ‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था होणार आहे. काय करावे काय करू नये असेच वाटेल. पण अशा वेळी मोह आवरा, म्हणजे नुकसान होणार नाही. शांत राहून काम करता येईल हे लक्षात ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात खरेदी- विक्रीचे व्यवहार जपून करा. नोकरदार वर्गाला कामाकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिकदृष्ट्या उधारीचे व्यवहार करू नका. राजकीय क्षेत्रात सध्या उत्साह वाटणार नाही. नवी ओळख होईल. जोडीदार आनंदी असेल. उपासना फलद्रूप होईल. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : ११, १७

महिलांसाठी : टोकाचे अंतर गाठू नका.

capri
मकर( ११ ते १७ मे २०२५ )

मकर : मर्यादा सांभाळा

१४ मे रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करत आहे. हा गुरू तुमच्या षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे. हा तुमच्या राशीला सहावा गुरू असेल. परिपूर्ण नियोजनाने काम केल्यास हा गुरू चांगला जाईल. पौर्णिमा कालावधीत ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. १५ तारखेला दुपारनंतर दिनांक १६ आणि १७ असे संपूर्ण दोन दिवस असा अडीच दिवसांचा कालावधी चांगला कसा जाईल याकडेच लक्ष द्या. कोणतेही निर्णय घेताना घाई करू नका. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव सध्या साध्य होणार नाही हे लक्षात ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. व्यवसायात महत्त्वाचे करार करताना काळजी घ्या. नोकरदार वर्गाला कामात गुंतून राहावे लागेल. आर्थिकदृष्ट्या व्यवहार रोखठोक करा. राजकीय क्षेत्रात आपण आपल्या मर्यादा सांभाळा. मित्र-मैत्रिणींची मदत मिळेल. घरगुती वातावरण ठीक राहील. योगसाधनेला महत्त्व द्या.

शुभ दिनांक : १३, १४

महिलांसाठी : समतोल साधण्याचा प्रयत्न करा.

Aqua
कुंभ( ११ ते १७ मे २०२५ )

कुंभ : शुभ सप्ताह

१४ मे रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करत आहे. हा गुरू तुमच्या पंचमस्थानात येत आहे. म्हणजे तुमच्या राशीला हा गुरू पाचवा असेल. पाचवा गुरू म्हणजे दुधात साखर सर्वच काही चांगले असेल. पौर्णिमा कालावधी भाग्योदयाचा राहील. भाग्य स्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. बऱ्याच दिवसांतून असे शुभ ग्रहमान आले आहे, असे म्हणायला हरकत नाही. आपल्या कामाचा श्रीगणेशा होणार आहे, त्यामुळे तुमचा उत्साह वाढणारा आहे. व्यवसायात अनपेक्षित लाभ होईल. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीचे प्रस्ताव येतील. आर्थिकदृष्ट्या बचत कराल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल. मित्र-मैत्रिणींसोबत मनोरंजन घडेल. संततीचा लाभ होईल. नातेवाईकांच्या शुभेच्छा पाठीशी राहतील. खर्च कराल. एकूणच सप्ताह शुभ असेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : ११, १६

महिलांसाठी : जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

pices
मीन( ११ ते १७ मे २०२५ )

मीन : आर्थिक मजबुती येईल

१४ मे रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करत आहे. हा गुरू तुमच्या चतुर्थस्थानात येत आहे. म्हणजेच तुमच्या राशीला हा गुरू चौथा असेल. सुखस्थानातील गुरू सुख दिल्याशिवाय राहणार नाही. पौर्णिमा कालावधीत शांतता पाळा. दिनांक ११, १२ हे दोन दिवस अळीमिळी गुपचिळी असे राहावे लागेल. एखादी गोष्ट पटली नाही तर ती बोलून दाखवू नका. नाही तर त्रास होण्याची शक्यता राहील. त्यापेक्षा शांत बसलेले चांगले. बाकी दिवसाचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न अपेक्षेपेक्षा चांगले राहील. नोकरदार वर्गाला कामात येणारे अडथळे दूर होतील. आर्थिक मजबुती येईल. सार्वजनिक ठिकाणी सहभाग राहील. कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्या. भावंडांची मदत मिळेल. धार्मिक कार्याची आवड राहील. आहारावर नियंत्रण ठेवा.

शुभ दिनांक : १३, १४

महिलांसाठी : मानसिक शांतता राखा.

डॉ. स्मिता अतुल गायकवाड

gsmita332@gmail.com

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या