आजचं राशिभविष्य : मंगळवार,१० जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 10, 2025

शृंखला नाईक

मेष - व्यवहार चातुर्य दाखवावे लागेल. धार्मिक कामातून मान मिळवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन विचारांची कास धरावी. बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करता येईल.

(Photo: Freepik)

मिथुन - आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. काही क्षणिक गोष्टींचा लाभ होईल.

(Photo: Freepik)

कर्क - मनातील इच्छा मोकळेपणाने बोलून दाखवावी. अती विचार करण्यात वेळ वाया जाईल.

(Photo: Freepik)

सिंह - कष्टाशिवाय पर्याय नाही. क्षुल्लक गोष्टींवरून मनस्तापाची शक्यता.

(Photo: Freepik)

कन्या - अती व्यवहारी वागून चालणार नाही. चिकाटीने कामे तडीस न्याल.

(Photo: Freepik)

तूळ - स्थावरची कामे मार्गी लागतील. उत्तम गृहसौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामानिमित्त प्रवास करावा लागेल. तुमच्यातील सुसंस्कृतपणा दिसून येईल.

(Photo: Freepik)

धनू - वडिलोपार्जित कामांतून लाभ संभवतो. आर्थिक बाबतीत विचारांती निर्णय घ्यावा.

(Photo: Freepik)

मकर - सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. प्रौढपणे आपले विचार मांडावेत.

(Photo: Freepik)

कुंभ - आर्थिक गुंतवणूक तूर्तास टाळावी. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड वाढू शकते.

(Photo: Freepik)

मीन - मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

09 June 2025 Horoscope: जोडीदाराची प्रगती दिसून येईल