(Photo: unsplash )

धूम्रपान न करणाऱ्या ‘या’ व्यक्तींवर होतो गंभीर परिणाम

Nov 09, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: unsplash )

पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे काय?

धूम्रपान करणाऱ्यांजवळ असताना त्यांच्या श्वासातून किंवा सिगारेटच्या टोकातून निघणारा धूर श्वासावाटे घेणे म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंग. त्यात ७,००० हानिकारक रसायने असतात.

(Photo: unsplash )

मुलांवर सर्वाधिक परिणाम

धुराच्या संपर्कात आलेल्या मुलांना दमा, कानाचे विकार, ब्राँकायटिस आणि अचानक मृत्यूचा धोका वाढतो.

(Photo: unsplash )

हृदयविकाराचा धोका

धूम्रपान न करणाऱ्यांनाही सेकंडहँड स्मोकमुळे हृदयविकार होण्याचा धोका २५-३०%  वाढतो.

(Photo: unsplash )

घरातील धूर अधिक घातक

बंद जागांमध्ये सिगारेटचा धूर बराच वेळ राहतो आणि त्यातील विषारी कणांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

(Photo: unsplash )

गर्भवती महिलांसाठी धोकादायक

धुराच्या संपर्कात आलेल्या गर्भवतींना अकाली प्रसूती, कमी वजनाचे बाळ किंवा बाळाच्या विकासात अडचणी अशा समस्या उदभवू शकतात.

(Photo: unsplash )

फुप्फुसांवर परिणाम

सेकंडहँड स्मोकमुळे खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि फुप्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

(Photo: unsplash )

‘थर्डहँड स्मोक’चाही धोका

धूर कपडे, भिंती किंवा फर्निचरवर पोहोचतो आणि त्यातील विषारी घटक दीर्घकाळ राहतात आणि त्यामुळे धूर विशेषतः मुलांसाठी हानिकारक असतो.

(Photo: unsplash )

सुरक्षित मर्यादा शून्यच!

तंबाखूच्या धुराचा कोणताही सुरक्षित स्तर नाही. धूरमुक्त घर आणि सार्वजनिक ठिकाणेच खरी सुरक्षितता मिळवून देतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video : 'शॉट रेडी आहे...' आणि मृणाल ठाकूरसोबत बघा काय घडलं...?