मुलांची ऊंची वाढवण्यासाठी 'हे' आहेत पौष्टिक पर्याय

Feb 29, 2024

Loksatta Live

वाढत्या लहान मुलांच्या उत्तम आरोग्याचा आणि विकासाचा पाया त्यांच्या आहारावर अवलंबून असतो.

(Photo: Unsplash)

मुलांचे आरोग्य आणि शरीरात होणारे बदल सुनिश्चित करण्यात संतुलित आहारातील पोषकतत्त्व महत्त्वाची भूमिका बजावतात. 

(Photo: Unsplash)

मात्र या पोषक घटकांचा समावेश मुलांच्या आहारात केल्याने त्यांच्या वाढीस मदत होते आणि त्यांची उंची देखील वाढू शकते. 

(Photo: Unsplash)

नियमितपणे दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने हाडांची वाढ चांगली होते. यामुळे उंची वाढण्यास आणि सक्रिय जीवनशैली राखण्यास हातभार लागतो. 

(Photo: Unsplash)

मासे आणि अंडी यासारखे उच्च प्रथिने असलेले पदार्थ स्नायूंच्या वाढीस मदत करतात. 

(Photo: Unsplash)

ओट्स,आणि ब्राऊन राईस हे फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात. हे लहान मुलांच्या शरीरातील ऊर्जेची पातळी राखण्यास मदत करते. 

(Photo: Unsplash)

पालकसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट असतात. हे शरीरातील हाडांच्या विकासास समर्थन देते. 

(Photo: Unsplash)

संत्रे, बेरी आणि पपई या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे हाडांच्या मजबूतीला चालना देते. 

(Photo: Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केस गळती टाळण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा