(Photo : Freepik)

पुरुषांनी दररोज मखाने का खावे?

Mar 12, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

मखाने हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अनेकदा आहारतज्ज्ञसुद्धा मखान्याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. मखान्याचे सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

(Photo : Freepik)

मखान्याचे सेवन हे स्नॅक्समध्ये करावे. मखाना प्रोटिनयुक्त आणि ग्लूटेन फ्री असतो. जर तुम्ही याचा आहारात समावेश केला, तर चरबी कमी करण्यासाठी मखाने उपयुक्त ठरू शकतात.

(Photo : Freepik)

असं म्हणतात की, पुरुषांनी मखाने खाणे चांगले आहे, पण असं का? पुरुषांनी दररोज मखाने का खाल्ले पाहिजे, या विषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत

(Photo : Freepik)

मखान्यामध्ये कॅल्शियमची मात्रा अधिक असते, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत राहतात. यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी -इंफ्लेमेटरीमुळे तणाव कमी करण्यास मदत होते.

(Photo : Freepik)

अनेक डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ मधुमेहाच्या रुग्णांनासुद्धा मखाने खाण्याचा सल्ला देतात; कारण यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.

(Photo : Freepik)

हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठीसुद्धा मखाने अत्यंत फायदेशीर असतात. यामध्ये असलेली मॅग्नेशियमची मात्रा हृदयाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करतात.

(Photo : Freepik)

पुरुषांनी मखान्याचे सेवन 'अँटी-एजिंग फूड' म्हणून करावे. कारण मखान्यात 'अँटी-एजिंग एन्जाइम' असतात, जे शरीरातील खराब झालेले प्रोटिन्स पुन्हा तयार करण्यास मदत करतात.

(Photo : Freepik)

मखान्याचे सेवन करून पुरुष वजन कमी करू शकतात. भूक कमी करण्यासाठी मखाने फायदेशीर आहेत. त्यामुळे अति खाण्याची सवय असणाऱ्यांनी मखाने खाणे चांगले आहे.

(Photo : Freepik)

 मखान्याच्या सेवनामुळे पुरुषांच्या शरीरारील टेस्टेस्टोरॉन हार्मोन वाढतात. यामुळे पुरुषांची लैंगिक क्षमता सुधारते. त्यामुळे पुरुषांनी नियमित मखाने खाल्ले पाहिजे.