जसप्रीत बुमराहच्या घरी चिमुकल्या पाहुण्याची एंट्री आशिया कप सोडून रविवारी तातडीने बुमराह मुंबईत परतला. यामुळे चाहते नाराज झाले होते पण आज जसप्रीत बुमराह व प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. लग्नाच्या दोन वर्षांनी आज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन या सुंदर जोडप्याच्या घरात चिमुकल्याचे आगमन झाले आहे. बुमराहने फोटो व बाळाचे नाव पोस्ट करून मुलगा झाल्याची माहिती दिली आहे. अंगद जसप्रीत बुमराह असे चिमुकल्याचे नाव आहे. अंगद या नावाचा अर्थही खूप खास आहे. गुरु अंगद देवजी हे शीखांचे दुसरे गुरु आहेत याचा अर्थ 'गुरु नानक देवजींचाच एक अंश' असा असल्याचे मानले जाते. तर संस्कृत भाषेत याचा अर्थ एक अलंकार, कंकण, योद्धा असाही होतो रामायणात अंगद हा वालीचा पुत्र होता पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी चारही दिशांनी येते ट्रेन! भारतातील एकमेव जागेविषयी जाणून घ्या महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी चारही दिशांनी येते ट्रेन! भारतातील एकमेव जागेविषयी जाणून घ्या