(Photo Source: Canva)
May 19, 2025
(Photo Source: Canva)
बेकायदेशीर वन्यजीव व्यापार, हवामानातील बदल आणि नैसर्गिक अधिवासांचा होणारा ऱ्हास यामुळे वन्यजीवांना मोठे धोके निर्माण झाले आहेत. शोध लागलेल्या नव्या प्रजातींचे जतन करण्यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.
(Photo Source: Canva)
जैवविविधतेतील व्यवस्थापनात सापांना अनन्यसाधारण महत्व राहिलेले आहे. पाण्यामध्ये राहणारे हे महाकाय साप वन्यजगतातील समृद्ध परिसंस्थेचे सूचक म्हणून काम करत असतात.
(Photo Source: Canva)
अॅनाकोंडाची ही प्रजाती अनुवांशिकदृष्ट्या १ कोटी वर्षांपूर्वीच्या मुळ हिरव्या अॅनाकोंडापेक्षा ५.५% वेगळी असल्याचे डीएनए संशोधनातून समोर आले आहे.
(Photo Source: Canva)
इक्वेडोरच्या वॉरानी जमातीची लोकं ७.५ मीटर लांबीच्या मोठ्या सापांबद्दल खूप पूर्वीपासून माहिती देतात. त्यांनीही या वैज्ञानिक निष्कर्षांना पाठिंबा दिला आहे.
(Photo Source: Canva)
नॅशनल जिओग्राफिक वाहिनीच्या 'पोल टू पोल' या माहितीपटाच्या चित्रीकरणात अनेक मोठ्या आकाराचे साप कॅमेरात टिपले गेले आणि रेकॉर्ड केले गेले, या शोमध्ये अभिनेता विल स्मिथ काम करत होता.
(Photo Source: Canva)
इक्वेडोरच्या बैहुएरी वाओरानी प्रदेशात आढळलेल्या प्रजातीचे स्थानिकांच्या मदतीने परीक्षण करण्यात आले आणि वैज्ञानिक पडताळणी करण्यात आली.
(Photo Source: Canva)
ही प्रजाती पूर्ण ताकदीने आणि हळूवार पद्धतीने शिकार करते, बिबटे, हरीण आणि कॅपीबारा सारख्या प्राण्यांची शिकार खातात. सर्वप्रथम ते आपल्या मोठ्या स्नायूंनी प्राण्यांची हाडे मोडतात आणि नंतर त्यांना संपूर्ण गिळून टाकतात.
(Photo Source: Canva)
यापूर्वीचा विक्रम धारक असलेल्या ग्रीन अॅनाकोंडाला या अॅनाकोंडाने आकार आणि वजन दोन्ही बाबींमध्ये मागे टाकले आहे, हा महाकाय साप ७.५ मीटर (२४.६ फूट लांबी) आणि ५०० किलो (१,१०० पौंड) वजनाचा आहे.
(Photo Source: Canva)
शास्त्रज्ञांनी २०२४ मध्ये अमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये, विशेषतः इक्वेडोरमध्ये, महाकाय अॅनाकोंडाची ही नवीन प्रजाती ओळखली आहे, या सापाने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि वजनदार सापाचा विक्रम मोडला.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
जगातील सर्वात लहान कुत्रा पाहिला का?