अयोध्येतल्या राम मंदिरातील रामाची मूर्ती साकारणारे अरुण योगीराज कोण आहेत?

(स्रोत: @arun_yogiraj/instagram)

Jan 06, 2024

Loksatta Live

येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पाडणार आहे. यावेळी प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

तुम्हाला माहिती आहे का कर्नाटकातील सुप्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती तयार केली आहे. ३७ वर्षीय अरुण हे कर्नाटकातील मैसूर येथील प्रसिद्ध शिल्पकार आहेत.

राम मंदिरातील रामाची मूर्ती साकारण्यासाठी अरुण सहा महिने अयोध्येत राहिले आणि ते १२ तास काम करायचे.

अरुण हे प्रसिद्ध मुर्तीकार योगीराज शिल्पी यांचा मुलगा आहे. पाच पिढ्यांपासून ते मूर्ती साकारतात. त्यांचे आजोबा बसवन्ना शिल्पी हे देखील प्रसिद्ध शिल्पकार होते.

अरुण योगीराज यांनी मैसूरच्या विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनी काही काळ खासगी कंपनीत सुद्धा काम केले.

पण मूर्तिकार होण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. अरुण यांना लहानपणापासून मुर्ती साकारण्याची आवड होती.

रामाची मूर्ती साकारण्यापूर्वी त्यांनी सुभाषचंद्र बोस यांचा ३० फूट उंच पुतळा बनवला होता, जो पंतप्रधान मोदींनी इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्थळाच्या मागे भव्य छताखाली स्थापित केला होता.

याशिवाय त्यांनी केदारनाथमध्ये स्थापन केलेली आदि शंकराचार्यांची १२ फुटी मूर्ती, मैसूर येथील महाराजा जयचमराजेंद्र वोडेयर  यांची १४.५ फूट पांढरी संगमरवरी पुतळा, महाराजा श्री कृष्णराज वाडियार चतुर्थ  आणि स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या पुतळ्यांची निर्मिती केली आहे.