गव्हाचे पीठ भेसळयुक्त आहे की नाही, कसे ओळखायचे?

Apr 11, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

पोळी बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा आपण दररोज वापर करतो. सकाळी आणि रात्रीच्या जेवणामध्ये आपण भाजीबरोबर पोळी खातो. 

(Photo : Freepik)

काही लोक गव्हाच्या पिठासाठी गहू खरेदी करतात पण काही लोक गहू खरेदी करण्यापेक्षा थेट गव्हाचे पीठ खरेदी करतात.

(Photo : Freepik)

हे गव्हाचे पीठ चांगले आहे का, हे तपासणे, तितकेच गरजेचे आहे.

(Photo : Freepik)

 गव्हाचे पीठ भेसळयुक्त आहे की नाही, हे कसं ओळखायचं?

(Photo : Freepik)

 मंद आचेवर एक तवा ठेवा आणि तव्यावर हे गव्हाचे पीठ टाका

(Photo : Freepik)

पिठाला लगेच रंग आला की समजायचे की त्यात भेसळ आहे आणि जर या पिठाला लगेच रंग आला नाही तर समजायचे की यात कोणतीही भेसळ नाही.

(Photo : Freepik)

ही ट्रिक वापरून तुम्ही घरच्या घरी गव्हाचे पीठ भेसळयुक्त आहे की नाही, हे ओळखू शकता.