एवीटी नॅचरल प्रोडक्टस्
(बीएसई कोड ५१९१०५)
स्मॉल कॅप
प्रवर्तक : ए वी थॉमस समूह
१००% निर्यातप्रधान असलेली ही कंपनी जागतिक दर्जाची ‘न्युट्रॉसिटीकल ओलिओरेझिन्स’ तसेच झेंडू आणि मसाल्याचे पदार्थ यांचे ‘ओलिओरेझिन्स’ बनवते. सध्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पात कंपनी खाद्य सुरक्षित नैसर्गिक स्वाद तसेच खाद्य रंग यांचे उत्पादन करत आहे. सध्या कंपनीच्या उलाढालीत झेंडू फुलाच्या लागवडीचा तसेच त्यांच्या ‘ओलिओरेझिन्स’चा जास्त वाटा आहे. मात्र आगामी काळात कंपनी नैसर्गिक रंग तसेच मसाल्यांच्या पदार्थाचे तेल (spice oil) तसेच डीकॅफ चहा यांच्या उत्पादनावर भर देण्यात येणार आहे. डिसेंबर २०१६ साठी संपलेल्या नऊ महिन्याच्या कालावधीसाठी कंपनीने २२७.४९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २१.२० कोटी रुपयांचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो २१% ने अधिक आहे. संशोधनावर दिलेला भर, उत्तम गुणवत्ता तसेच उत्पादन विविधता या सर्वच कारणांमुळे कुठलेही कर्ज नसलेली ही स्मॉल कॅप कंपनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटते.
सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.