मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. पहिल्या दिवशी १ कोटी ७ लाख आणि दुसऱ्या दिवशी १ कोटी २५ लाख महिलांना लाभ मिळाला. काही ठिकाणी ३० लाख अर्ज बाद होण्याच्या बातम्या आल्या आहेत, पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या अपप्रचारावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. २ कोटी ४१ लाख महिलांना लाभ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.