‘पोर्टफोलिओ’चा त्रमासिक आढावा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोर्टफोलिओचा हा त्रमासिक आढावा थोडा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवा. कारण २०१७ मधील हे पहिले तीन महिने तर आर्थिक वर्षांचे शेवटचे. आपल्या देशात बहुतांशी कंपन्या आर्थिक वर्षांप्रमाणे आपले कामकाज बघत असल्याने या सर्वच कंपन्यांची वार्षिक आर्थिक कामगिरी ३० मे २०१७ पर्यंत जाहीर होईल. फंडामेन्टल अ‍ॅनालिसिस करणाऱ्या कुठल्याही गुंतवणूकदारांसाठी हा अभ्यास फार महत्त्वाचा असतो. आर्थिक वर्षांच्या या शेवटच्या तिमाहीत खूप महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आहेत, त्याचाही गुंतवणुकीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होणार आहेच. यात प्रामुख्याने अर्थसंकल्प, नोटाबंदीनंतर कंपन्यांनी जाहीर केलेले नऊमाहीचे आर्थिक निष्कर्ष, आयडिया आणि व्होडाफोन यांचे एकत्रीकरण, ब्रेग्झिट विधेयकाला अंतिम मंजुरी, उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील निवडणुका आणि त्यात केंद्रात सत्तारूढ असलेल्या भाजपला मिळालेले घवघवीत यश, डीमार्टचा यशस्वी आयपीओ आणि जीएसटी विधेयक यांचा समावेश करावा लागेल.

यंदा पोर्टफोलिओमध्ये निवडण्यात आलेल्या कंपन्या या बहुतांशी मिड कॅप किंवा लार्ज कॅप आहेत. त्यामुळे नफा थोडा कमी होण्याची शक्यता असली तरीही हा पोर्टफोलिओ तुलनेत सुरक्षित आणि द्रवणीय असेल. पहिल्या तिमाहीत पोर्टफोलिओची कामगिरी ३.५ टक्के नुकसानीमुळे तितकीशी चांगली वाटत नसली तरीही आपली गुंतवणूक मध्यम ते दीर्घकालीन कालावधीसाठी असल्याने हे सर्वच शेअर्स खरेदी/ राखून ठेवावेत.

डिव्हिज लॅबवर मात्र विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कारण अमेरिकेची औषध नियंत्रक यंत्रणा – यूएस एफडीएने कंपनीला जारी केलेली वॉर्निग नोटीस. संभाव्य धोका पत्करू शकणारे गुंतवणूकदार मात्र यात अजूनही गुंतवणूक करू शकतात.

गेल्या पाच वर्षांप्रमाणेच २०१७-१८ हे आर्थिक वर्षदेखील पोर्टफोलिओच्या वाचकांना आणि गुंतवणूकदारांना सुख-समृद्धीचे जाणार यात शंकाच नाही. नवीन अर्थवर्षांसाठी आणि पुढील गुंतवणुकीसाठी शुभेच्छा!

 

 

 

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investment analysis and portfolio management