Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे अत्यंत प्रसिद्ध असे राजनीतिचे पंडित होते. चाणक्यांचे जन्मनाव विष्णुगुप्त होते आणि चणक नावाच्या आचार्याचे ते पुत्र असल्याने त्यांचे नाव चाणक्य असे पडले. . आज अनेकांसाठी चाणक्यांचे विचार व नीती या ज्ञानामृतपेक्षआ कमी नाही. चाणक्य यांनी त्यांच्या नीतीद्वारे माणसाने आयुष्य कसे जगावे, याचा मंत्र दिला आहे. राजनैतिक, सामाजिक, आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग त्यांनी दाखवला. त्यांच्या नीती जीवन जगण्याची कला शिकवतात.
आचार्य चाणक्य यांच्या नीती अनेक जण फॉलो करतात. चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये आर्थिक, राजकीय व्यवहारापासून वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये त्यांनी यशस्वी व्यक्तीमध्ये असलेल्या ७ सवयी सांगितल्या आहेत. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. यशस्वी व्यक्तीमध्ये ७ सवयी असतात. आचार्य चाणक्य सांगतात की व्यक्तीने जीवनात या ७ गोष्टी अंगिकारल्या तर त्यांना यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही
योजना
आचार्य चाणक्य सांगतात की जे लोक योजना बनवत नाही ते अयशस्वी होण्याची योजना बनवतात. त्यामुळे यशस्वी लोक कोणतेही काम योजनेशिवाय करत नाही.
संयम
कोणत्याही परिस्थितीमध्ये घाईने कोणताही निर्णय घेऊ नये, परिस्थितीचा संयमाने आणि धैर्याने सामना केला पाहिजे.
आचार्य चाणक्यनुसार, संयम कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करतो. यशस्वी व्यक्तीमध्ये संयम असतो.
मेहनत
मेहनतीशिवाय यश मिळणे अशक्य आहे. यशस्वी व्यक्तीला मेहनत करण्याची सवय असते.
ध्येय
ज्या व्यक्तीचे ध्येय ठरलेले आहे त्यांना योग्य मार्ग मिळतो आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे शक्य होते. ध्येयापासून दूर गेलेल्या व्यक्तीला यश मिळणे कठीण जाते. त्यामुळे यशस्वी व्यक्तीचे ध्येय ठरलेले असते.
प्रयत्न
यश प्राप्त करण्यासाठी नियमित प्रयत्न केला पाहिजे. यशस्वी व्यक्ती नेहमी यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. ते कधीही हार मानत नाही.
शिस्त
आचार्य चाणक्य नुसार, जे लोक शिस्तप्रिय आहे त्यांच्या जीवनात स्थिरता येते आणि शिस्त ही माणसाला योग्य मार्गावर चालायला आणि कामामध्ये नियमितता आणण्यात मदत करते.
बुद्धीचा वापर
कोणत्याही कार्याची निवड करण्यासाठी सर्वात जास्त बुद्धीचा वापर करणे गरजेचे आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)