मेष
कुलस्वामिनीचे चिंतन करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहेत. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – तपकिरी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ
कुलदैवतांचे स्मरण आणि दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यवसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटूंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – निळा

मिथुन
गणपती दर्शन आणि गणपती स्त्रोत पठण करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. विद्यार्थ्यांना, व्यवसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहाने सावकाश चालवावीत.
आजचा रंग- राखाडी

कर्क
गणपती स्त्रोत म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. महत्त्वकांक्षी निर्णयांचा दिवस. व्यवसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलांची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचा योग संभवतात.
आजचा रंग- तपकिरी

सिंह
ओम गं गणपतैय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल.
आजचा रंग- लाल

कन्या
दक्षिणमुखी मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यवसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावे.
आजचा रंग – मोरपंखी

तुळ
लक्ष्मीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसुल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक
मारुतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वपूर्ण निर्णय घेवू शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता ठेवावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – जांभळा

धनु
श्री क्लीम भगवतैय नम: या मंत्राच जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावीत. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – निळा

मकर
गणपती आणि मारुतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – लाल

कुंभ
गणपती अर्थव शीर्ष पठण करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. आधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम . नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कम्युडिटी शेअर्स, बँकिंग क्षेत्रामधील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग -लाल

मीन
मारुती स्त्रोत म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. प्रगतीकारक ग्रहमान, कौटुंबिक सौख्य लाभेल. दुरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – पिवळा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 1 august