मेष
ओम श्रीं भानवे नम: जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. धाडसी योजना राबवू शकाल. महत्वकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. भाग्यकारक घटनांचा दिवस.
आजचा रंग – हिरवा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ
ओम श्रीं नम: या बीज मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंब सहवास लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणे मंजूर करू शकाल. पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग संभवतात. आप्तेष्ठांबरोबर आनंदी वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – हिरवा

मिथुन
आज कालभैरव अष्टक म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. व्यावसायिकांना स्पर्धा जाणवेल. दूरच प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मोठी आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. बांधकाम व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. शेअर्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

कर्क
ओम शुक्राय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. जुनी येणी वसूल करू शकाल. आर्थिक चणचण कमी होईल. मोठ्या व्यावसायिक गुंतवणुकीचे ग्रहमान. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल.
आजचा रंग – फिकट पिवळा

सिंह
गणपती मंदिरात गुळ खोबरे ठेऊन दिवसाचा प्रारंभ करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. सर्व प्रकारच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. नवीन योजना राबवण्यासाठी अनुकूल ग्रहमान. प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांना उत्तम ग्रहमान.
आजचा रंग – तपकिरी

कन्या
गणपती मंदिरात दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वादविवाद टाळावेत. दगदगीच्या प्रवासाचे योग. भावंडांबरोबर वेळ आनंदात जाईल. बांधकाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग – निळा

तुळ
गणेश अष्टक म्हणून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. विनाकारण कर्ज घेऊ नये. जामीन राहू नये. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आप्तेष्ठांच्या आणि भावंडांच्या गाठीभेटीचे योग.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक
ओम श्रीं भानवे नम: जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान. सामाजिक प्रतिष्ठेचे योग. मोठ्या योजना राबवू शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – केशरी

धनु
ओम श्रीं नम: या बीज मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. मोठी आर्थिक उलाढाल करू शकाल. वाहने जपून चालवावीत. दगदगीच्या प्रवासाचे योग. नोकरी व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – राखाडी

मकर
कालीमातेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. प्रवास जपून करावेत. आजारांकडे दुर्लक्ष करू नये. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. पचनाचे विकार संभवतात.
आजचा रंग – हिरवा

कुंभ
ओम क्लिंम श्रीं या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाशी निगडीत व्यवसायामध्ये यश येईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग- मोरपंखी

मीन
देवी कवचाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विनाकारणाच्या चिंता सतावतील. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेच्या विकारांपासून स्वत:ला जपावे.
आजचा रंग – हिरवा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 26 july