Why Contra Fund is different and how it performed in the past : शेअर मार्केटमध्ये बऱ्याचदा गुंतवणूकदार चांगली कामगिरी करणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. परंतु कॉन्ट्रा फंड हा अगदी बाजाराच्या प्रवाहाविरोधात जात फायदा मिळवून देतो. ज्या समभागांची कामगिरी खराब आहे, अशा समभागांमध्ये पैसे गुंतवले जातात, त्यालाच कॉन्ट्रा फंड म्हणतात. खरं तर कॉन्ट्रा फंड्सची संकल्पना सध्या घसरत असलेल्या परंतु भविष्यात चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा असलेल्या शेअर्सची ओळख करून पैसे गुंतवणे ही आहे. त्यांना कॉन्ट्रा फंड म्हणतात, कारण ते सामान्य ट्रेंडच्या विरुद्ध दिशेने जातात. देशात अशा फंडांची संख्या मोठी नाही, परंतु गेल्या एका वर्षात त्यांचा परतावा १६ ते २६ टक्क्यांपर्यंत आहे. इतकेच नाही तर या फंडांनी गेल्या ५ किंवा १० वर्षांत आकर्षक परतावाही दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॉन्ट्रा फंडांची भारतातील कामगिरी

सध्या भारतात फक्त तीन म्युच्युअल फंड हाऊस कॉन्ट्रा फंड देत आहेत. १. एसबीआय कॉन्ट्रा फंड, २. इन्वेस्को इंडिया कॉन्ट्रा फंड आणि ३. कोटक इंडिया ईक्यू कॉन्ट्रा फंड, असे हे तीन फंड आहेत. या तिन्ही फंडांनी परताव्याच्या बाबतीत आतापर्यंत त्यांच्या गुंतवणूकदारांना निराश केले नाही. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार त्यांचा परतावा काय आहे ते पाहू यात.

एसबीआय कॉन्ट्रा फंड (डायरेक्ट स्कीम)

व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM): १६,७८१.१५ कोटी

१ वर्षाचा सरासरी परतावा: २६.७१%

५ वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा: २३.४३%

१० वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा: १८.३६%

इन्वेस्को इंडिया कॉन्ट्रा फंड (डायरेक्ट स्कीम)

व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM): ११,४२६.२४ कोटी

१ वर्षाचा सरासरी परतावा: १६.५८%

५ वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा: १६.९९%

१० वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा: २०.५५%

हेही वाचाः मोठी बातमी! १७ हजार कोटींचा हिरा व्यापार सूरतला हलवत गुजराती व्यापाऱ्यांचा मुंबईला मोठा धक्का

कोटक इंडिया ईक्यू कॉन्ट्रा फंड (डायरेक्ट स्कीम)

व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM): १,८६६.२२ कोटी

१ वर्षाचा सरासरी परतावा: २२.५६%

५ वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा: १८.३९%

१० वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा: १७.२१%

कॉन्ट्रा फंडातून मिळणाऱ्या कमाईवर किती कर आकारला जातो?

कॉन्ट्रा फंडाची ६५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक इक्विटी शेअर्समध्ये आहे. यामुळेच त्यांना इक्विटी म्युच्युअल फंडांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत समान कर नियम कॉन्ट्रा फंडांना लागू होतात, जे इक्विटी फंडांनासुद्धा लागू असतात. म्हणजेच जर तुम्ही ही निधीची गुंतवणूक १ वर्षापेक्षा कमी कालावधीत काढून घेतली, तर तुम्हाला १५ टक्के दराने शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) कर भरावा लागेल. परंतु १ वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीच्या गुंतवणुकीतून झालेल्या नफ्यावर केवळ १० टक्के दराने दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG) कर भरावा लागतो. विशेष बाब म्हणजे जर तुमचा दीर्घकालीन भांडवली नफा एका आर्थिक वर्षात १ लाख रुपयांच्या आत असेल, तर त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. इतर फंडांप्रमाणे कॉन्ट्रा फंड्समध्ये लाभांश उत्पन्नावर कर सवलत नाही आणि स्लॅबनुसार थेट गुंतवणुकीच्या करपात्र उत्पन्नात जोडून प्राप्तिकर आकारला जातो.

हेही वाचाः NPS द्वारे तुम्हाला निवृत्तीनंतर १ लाख मासिक पेन्शन मिळणार अन् करोडपती बनण्याची संधी, गणित समजून घ्या

हुशारीने गुंतवणूक करा

देशातील तीन कॉन्ट्रा फंडांनी आतापर्यंत चांगला परतावा दिला आहे, परंतु मागील कामगिरी पाहता भविष्यातही ते असा परतावा देत राहतील हे सांगणं थोडं कठीण आहे. तसेच असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या मते, कॉन्ट्रा फंड हे अत्यंत उच्च जोखमीच्या गुंतवणुकीच्या श्रेणीत येतात. साहजिकच यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्याही गुंतवणूकदाराने त्याच्या जोखमीच्या क्षमतेचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contra funds provide leverage against market trends yielding 16 to 26 percent returns in a year vrd