Credit Card Tips: अधिकाधिक लोक त्यांचे महिन्याचं क्रेडिट वापराचं बिल भरत असतात, ऑनलाइन शॉपिंग आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीही करीत असतात, ज्यामुळे क्रेडिट कार्ड पेमेंट मोठ्या प्रमाणात वाढते. क्रेडिट कार्ड तुमचा आर्थिक बॅलन्स लवकर संपवतो. काही लोक त्यांचे सर्व खर्च क्रेडिट कार्डने भरतात, कारण ते त्यांना दरमहा त्यांच्या खर्चाचा मागोवा ठेवण्यास मदत करते. जेव्हा त्यांचा पगार महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला जमा होतो, तेव्हा ते त्यांचे क्रेडिट कार्ड बिल भरतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रेडिट कार्ड वापरताना अनेकदा सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमचा पेमेंट इतिहास, क्रेडिट युटिलायझेशन आणि नवीन क्रेडिट हे तुमचा क्रेडिट स्कोअर ठरवण्याचे प्रमुख मापदंड आहेत. तुमच्या क्रेडिट युटिलायझेशन रेशोची (CUR) गणना करण्यासाठी एकूण क्रेडिट कार्डच्या शिलकीला तुमच्या एकूण क्रेडिट कार्ड मर्यादेने विभाजित करा आणि नंतर १०० ने गुणाकार करा, असे केल्याने तुम्हाला तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो(CUR) कळेल.

क्रेडिट वापराचे प्रमाण कसे ठरवाल?

हा एक महत्त्वाचा घटक आहे, जो तुमचे क्रेडिट कार्ड खर्च नियंत्रणाबाहेर जात असल्यास वेळीच सावध करतो. एखाद्या व्यक्तीने त्याच्या क्रेडिट कार्डवर वापरलेल्या क्रेडिट मर्यादेची ही टक्केवारी आहे. चांगल्या क्रेडिट स्कोअरसाठी निरोगी CUR राखणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे १,००,००० रुपयांची एकूण क्रेडिट मर्यादा असलेली दोन क्रेडिट कार्डे असतील आणि तुमच्याकडे सध्या दोन्ही कार्डांवर एकत्रित थकबाकी म्हणून ३०,००० रुपये असतील, तर तुमचे क्रेडिट वापराचे प्रमाण ३० टक्के असेल. Bankbazaar.com चे CEO आदिल शेट्टी म्हणतात, “चांगला क्रेडिट स्कोअर राखण्यासाठी ३० टक्क्यांपेक्षा कमी CUR ची शिफारस केली जाते. उच्च CUR म्हणजे ग्राहक त्यांच्या उपलब्ध क्रेडिटपैकी खूप जास्त वापरत आहेत हे दर्शवतो, ज्यामुळे त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणूनच क्रेडिट कार्डचा वापर जबाबदारीने करणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचाः विश्लेषण: चीनच्या अर्थव्यवस्थेवर ‘डिफ्लेशन’चा धोका कायम; नेमका अर्थ काय?

क्रेडिट स्कोअरवर परिणाम कसा होतो?

CIBIL, Experian, Equifax आणि CRIF सारखे क्रेडिट ब्युरो विविध घटकांच्या आधारे व्यक्तींच्या क्रेडिट स्कोअरची गणना करतात. CUR हा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा तुम्ही नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता, जसे की कर्ज किंवा इतर कोणतेही क्रेडिट कार्ड घेताना सावकार तुमच्या CUR चे मूल्यांकन करतात. “ग्राहकांनी त्यांचे क्रेडिट कार्ड खर्च प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी बजेट सेट केले पाहिजे,” असंही आदिल शेट्टी सुचवतात.

हेही वाचाः आयुष्यमान भारत योजनेत ७.५ लाख लाभार्थ्यांचे एकाच नंबरवरून कार्ड बनवले, कॅगने लोकसभेत केला धक्कादायक खुलासा

पत मर्यादा किती असते?

कमी CUR राखल्याने तुमच्या विद्यमान क्रेडिट कार्डावरील क्रेडिट मर्यादा वाढवण्याची शक्यता वाढू शकते. उच्च क्रेडिट मर्यादा तुमच्या उपलब्ध क्रेडिटमध्ये वाढ करेल आणि तुमचा CUR कमी करेल, ज्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरचा संभाव्य फायदा होईल. तुमचा खर्च जास्त असल्यास तुम्ही तुमची क्रेडिट मर्यादा वाढवण्यास सांगू शकता. काहीवेळा कार्ड देणाऱ्या सावकार कंपन्या त्यांच्या कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या ग्राहकांना उच्च क्रेडिट मर्यादा देतात. तुमचा CUR ३० टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra exhaust the entire credit card limit every month then you have to bear the loss what is the solution find out vrd