ज्याप्रमाणे म्युचुअल फंडाच्या एखाद्या योजनेला रिस्क प्रोफाईल बंधनकारक आहे त्याच प्रमाणे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॅरिटी (पीएफआरडीए) ने आपल्या १२ मे २०२२ च्या परिपत्रकानुसार एनपीएसच्या टीअर-१ आणि टीअर-२ फंडांचे व्यवस्थापन करणाऱ्या सर्व पेन्शन फंडाना दि. १५ जुलै २०२२ पासून ई(इक्विटी) , सी (कार्पोरेट), जी (गव्हर्न्मेंट सिक्युरिटीज ) व ए (अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट) या सर्व अ‍ॅसेट क्लासमधील गुंतवणुकीचे रिस्क अ‍ॅनालिसीस करून त्यानुसार गुंतवणुकीतील रिस्क प्रोफाईल गुंतवणुकदारास उपलब्ध करू देणे बंधनकारक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे रिस्क प्रोफाईल पुढील प्रमाणे असेल

१)लो रिस्क २) लो टू मॉडरेट ३) मॉडरेट ४) मॉडरेटली हाय ५) हाय रिस्क व ६) व्हेरी हाय रिस्क

हे रिस्क प्रोफाईल सबंधित पेन्शन फंडाच्या वेबसाईट वर प्रत्येक तिमाही संपताच १५ दिवसांच्या आत दर्शविणे आवश्यक असणार आहे.

असे रिस्क प्रोफाईल करताना संबंधित पेन्शन फंडाने गुंतवणूकदराने निवडलेल्या फंडातील डेट (Debt) मधील जी गुंतवणूक असेल त्यातील ज्या प्रकारचे डेट इन्स्ट्रुमेन्ट्स असतील त्यातील जोखीम विचारात घेऊन ० ते १२ च्या दरम्यान सबंधित इन्स्ट्रुमेन्ट्ला नंबर दिला पाहिजे . ० हा क्रमांक जास्तीत जास्त सुरक्षितता (हायेस्टसेफ्टी) दर्शवितो तर १२ हा नंबर जास्तीत जास्त जोखीम (व्हेरी हाय रिस्क) दर्शवितो. पोर्टफोलिओ रिस्क प्रोफाईल ठरविताना एकूण डेट किती प्रमाणात आहे व डेटचे एकत्रित रिस्क किती आहे हे विचारात घेऊन पोर्टफोलिओ रिस्क दर्शविणे आवश्यक असणार आहे.

हेही वाचा… Money Mantra: Post Retirement Income: रिटायरमेंटनंतरचं उत्पन्न करपात्र की करमुक्त?

गुंतवणूकदाराने निवडलेल्या प्लॅनचे मार्च अखेरीचे रिस्क प्रोफाईल व आर्थिक वर्षात रिस्क प्रोफाईलमध्ये किती वेळा बदल झाला याबाबतची माहिती संबंधित पेन्शन फंडाच्या वेबसाईटवर उपलब्ध असणे आवश्यक असणार आहे. यामुळे गुंतवणुकदारास गुंतवणूक करताना आपण किती प्रमाणात रिस्क घेत आहोत व त्यानुसार किती रिटर्न मिळू शकेल याचा अंदाज येऊ शकेल व त्यानुसार निवडलेल्या पर्यायात गुंतवणूक यापुढे राहू द्यायची की त्यात बदल करायचा या बाबत निर्णय घेणे सोपे होईल.

मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि रिस्को मीटर व जेव्हढे रिस्क दर्शविले असेल नेमके तेव्हढेच रिस्क सदर गुंतवणुकीस असेल असे नाही. तर दर्शविलेले रिस्क ईंडीकेटीव्ह (सूचक) पद्धतीचे असते. यावरून गुंतवणूकदार आपण किती गुंतवणूक करताना किती रिस्क घेत आहोत याचा अंदाज बांधता शकतो व त्यानुसार गुंतवणुकीतून आपल्याला किती रिटर्न मिळू शकेल याचा अंदाज घेऊ शकतो. थोडक्यात रिस्कोमीटरमुळे आपण आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकतो.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nps and risk profile pension fund regulatory and development authority mmdc dvr