तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक ही नेहमीच गुरुकिल्ली मानली जाते. गुंतवणुकीच्या मदतीने तुम्ही कोणतीही चिंता न करता आर्थिकदृष्ट्या सुदृढ जीवन जगू शकता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही जितक्या लवकर बचत सुरू कराल तितके चांगले यश मिळवाल. अशा परिस्थितीत नोकरी मिळताच पैशांची बचत करायला सुरुवात करावी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लवकर गुंतवणुकीला सुरुवात करा

जेव्हा तुम्ही कमावते होतो तेव्हा फार काळ वाट न पाहता गुंतवणुकीला सुरुवात करावी. नोकरी सुरू होताच बचत सुरू करावी. उदाहरणार्थ, तुम्ही दरमहा १०,००० रुपये गुंतवायला सुरुवात केली, ज्यावर तुम्हाला १२ टक्के परतावा मिळत आहे. जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी ही गुंतवणूक सुरू केली तर ६० वर्षापर्यंत तुमची गुंतवणूक ६,४३,०९,५९५ रुपये होईल. विशेष म्हणजे तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षी गुंतवणूक हे करायला सुरुवात केली, तर तुमची गुंतवणूक वयाच्या ६० व्या वर्षी ३,४९,४९,६४१ रुपये होणार आहे.

हेही वाचाः १ कोटींचा निधी जमवायचाय? मग म्युच्युअल फंडात १५X१५X१५ चा फॉर्म्युला वापरा अन् मग बघा…

पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा

तुम्ही कोणत्याही एका गुंतवणुकीच्या पर्यायावर पूर्णपणे अवलंबून राहू नये. तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये नेहमी विविधता आणा. उदाहरणार्थ, जर तुम्ही तरुण गुंतवणूकदार असाल, तर इक्विटीमध्ये पूर्णतः गुंतवणूक करू नका. वेगवेगळे पर्याय जसे की, तुम्ही कर्ज आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करावी.

हेही वाचाः Money Mantra : पॅन कार्ड बंद झाल्यास पगार मिळण्यात काही अडचण येईल का? तज्ज्ञ म्हणतात

नेमकं गुंतवणूक चक्र समजून घ्या

प्रत्येक वेळी मालमत्ता तुम्हाला चांगला परतावा देत नाही. कधी कधी शेअर बाजारात परतावा चांगला असतो, तर कधी बँक एफडीदेखील व्याजदर वाढल्यावर चांगला परतावा देतात. तसेच कधी कधी गुंतवणूकदारांना रिअल इस्टेटमध्ये चांगल्या संधी मिळतात. या कारणास्तव गुंतवणूकदारांनी नेहमी गुंतवणूक चक्र समजून घेतले पाहिजे. यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराचे मतही जाणून घेऊ शकता.

चक्रवाढीचा लाभ मिळणार

 १५ वर्षांपर्यंत अशा योजनेत दरमहा १५,००० रुपये गुंतवले पाहिजेत, ज्यामध्ये वार्षिक १५ टक्के व्याज मिळत असेल, तर मॅच्युरिटीवर तुमचा निधी ७ अंकांमध्ये असला पाहिजे म्हणजेच तो १ कोटी रुपये झाला पाहिजे. तुमची एकूण गुंतवणूक फक्त २७ लाख रुपये असेल. म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला सुमारे ७३ लाख रुपयांचा नफा मिळणार आहे. दुसरीकडे तुम्ही पुढील १५ वर्षे अशीच गुंतवणूक करत राहिल्यास तुमचा निधी १० कोटी रुपयांपर्यंत वाढेल.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want to get rich then follow these three rules for investing vrd