अमेरिकेतील कॅलिफोर्नियात तीन अज्ञात शस्त्रधाऱयांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १४ जण ठार आणि २० जण जखमी झाले आहेत. हल्लेखोर एका इमारतीतून हल्ला करत असून पोलिसांनी इमारतील घेराव घातला आहे. हल्लेखोऱांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या सशस्त्र कारवाईत दोन हल्लेखोर ठार, तर एक पोलीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
सॅन बर्नडिनोमधील इनलँड रिजनल सेंटरच्या अपंगांवर उपचार करण्यासाठी बांधण्यात आलेल्या रुग्णालयाच्या आवारात रुग्णांसाठी आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रम सुरू असताना गोळीबार होण्यास सुरूवात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हल्ल्यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
  संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2015 रोजी प्रकाशित  
 अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, १४ ठार
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात तीन अज्ञात शस्त्रधाऱयांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १४ जण ठार
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
  Updated:   
 
  First published on:  03-12-2015 at 11:36 IST  
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: California shooting two suspects dead after killing 14 in san bernardino social service centre