हैदराबादमध्ये अलीकडेच झालेल्या बॉम्बस्फोटांचा चीनने निषेध केला असून भारत सरकार आणि स्फोटात बळी गेलेल्या कुटुंबीयांप्रति सहानुभूती व्यक्त केली आहे.चीन या बॉम्बहल्ल्यांचा निषेध करीत असून भारत सरकार, भारतीय जनता आणि स्फोटातील बळी गेलेल्यांचे कुटुंबीय तसेच जखमींबद्दल आम्हाला अत्यंत सहानुभूती वाटते, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी येथे पत्रकारांना सांगितले. या स्फोटात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना आम्ही शोकसंदेश पाठविला असल्याचे ते म्हणाले.हैदराबादमध्ये गेल्या गुरुवारी सायंकाळी झालेल्या या बॉम्बस्फोटात १६ जण ठार व १८० जखमी झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China condemns hyderabad bomb blasts