भारतीय रेल्वे आता देशभरात ३ हजार किमीपर्यंत पसरलेल्या रेल्वे मार्गावरील ९०२ फाटके बंद करण्याचा विचार करीत आह़े  रेल्वे गाडय़ांचा सरासरी वेग वाढविण्यासाठी आणि रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे कळत़े या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी रेल्वेला तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आह़े  हा खर्च गुजरात, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांशी संयुक्त विद्यमाने करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल़े
यासाठी ५३८ ठिकाणी भूमिगत मार्ग, ३२० ठिकाणी उड्डाण पुलांचे बांधकाम करण्यात येणार आह़े   ६५ हजार किमी लांबीच्या लोहमार्गावर ३२ हजार ६४९ फाटके आहेत़  या पैकी ९०२ फाटके काढून टाकण्याचा नियोजनबद्ध आराखडा आह़े  याचा समावेश २०१३-१४ या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पातही करण्यात येणार आहे.