दिल्लीत गेल्या आठवड्यात तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या विरोधात झालेल्या उग्र निदर्शनादरम्यान जखमी झालेल्या दिल्ली पोलिसांच्या हवालदाराचे आज (मंगळवार) सकाळी निधन झाले.
हवालदार सुभाष चंद तोमर ४७) यांनी आज सकाळी राम मनोहर लोहिया रूग्णालयामध्ये आपले प्राण सोडले. रूग्णालयात दाखल केल्यापासून ते वेंटिलेटरवर होते. तोमर उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील राहणारे आहेत.
तोमर यांची नियुक्ति करावल नगरच्या भागात झाली होती. रविवारी आंदोलनाच्या दरम्यान सुरक्षा व्यवस्थेसाठी त्यांनी इंडिया गेट वर बोलवण्यात आले होते. त्यानंतर आंदोलकांसोबत झालेल्या हिंसाचारात ते जखमी झाले. त्यांना टिळक मार्गांवर जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ताबडतोब रूग्णालयात भरती केले होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2012 रोजी प्रकाशित
दिल्ली सामूहिक बलात्कार विरोधी आंदोलन : दिल्ली पोलिसांच्या जखमी हवालदाराचे निधन
हवालदार सुभाष चंद तोमर ४७) यांनी आज सकाळी राम मनोहर लोहिया रूग्णालयामध्ये आपले प्राण सोडले. रूग्णालयात दाखल केल्यापासून ते वेंटिलेटरवर होते. तोमर उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील राहणारे आहेत.

First published on: 25-12-2012 at 10:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi police constable subhash chand tomar injured in violence at indiagate dies