दिल्लीत बसमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली असून अधिक चौकशीत पीडित मुलीच्या भावानेच तिच्यावर सहा महिन्यांपूर्वी बलात्कार केल्याचे उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्ीडित मुलीच्या भावाला अटक केली आहे.
कुटुंबातील वादाला कंटाळल्यामुळे घरातून पळालेल्या १६ वर्षीय मुलीचा शनिवारी रात्री चालत्या बसमध्ये बसवाहकाने विनयभंग केल्याची घटना घडली. रात्री ९.३० च्या सुमारास मुलीने घर सोडले होते. मात्र रात्री ११ च्या सुमारास मंडी हाऊस येथे ती एकटीच बसमध्ये रडत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. दिल्लीत चालत्या बसमधील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करून बसचा वाहक रणजित सिंग याला अटक केली.
याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन तिचा जबाब नोंदविला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिच्या वडिलांनी तीन लग्ने केली असून ते तिसऱ्या पत्नीसोबत राहत होते. घरातील कौटुंबिक वातावरण बिघडले असून सहा महिन्यांपूर्वी तिच्या भावानेच आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचेही तिने सांगितले. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून तिचा भाऊ नजाकत अली (१९) यालाही अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2013 रोजी प्रकाशित
विनयभंग झालेल्या अल्पवयीन मुलीवर भावाकडूनच बलात्कार
दिल्लीत बसमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली असून अधिक चौकशीत पीडित मुलीच्या भावानेच तिच्यावर सहा महिन्यांपूर्वी बलात्कार केल्याचे उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्ीडित मुलीच्या भावाला अटक केली आहे.
First published on: 01-01-2013 at 04:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dishonoured minor girl raped by brother