अमेरिकेच्या नासा या संस्थेने मंगळावर पाठवलेल्या क्युरिऑसिटी या गाडीने तेथील दगड फोडून तेथील मातीच्या केलेल्या विश्लेषणावरून तिथे एकेकाळी पाणी असल्याचे आणखी पुरावे मिळाले आहेत, तेथे पाणी होते एवढेच नव्हे तर ते पिण्यायोग्य होते, स्थितीही सजीवांसाठी अनुकूल होती.ही गाडी ज्या गेल विवरात उतरली आहे तिथे अब्जावधी वर्षांपूर्वी पाणी होते. क्युरिऑसिटीवर असलेल्या मास्ट कॅमेऱ्याने तेथील पृष्ठभागाचे अवरक्त किरण तंत्राने छायाचित्रण केले आहे. त्यात काही जलयुक्त खनिजांचे अवशेष दिसून आले आहेत.
डॉ. मॅक्झिम लिटवाक, स्पेस रीसर्च इन्स्टिटय़ूट, मॉस्को
डॉ. मेलिसा राइस
कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी
