निवड व प्रशिक्षण
मार्सवन प्रकल्पात चाळीस उमेदवारांना मंगळावर जाण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल व नंतर मंगळावर वस्तीला पहिल्यांदा कोण जाणार हे टीव्ही प्रेक्षकांचे मतदान घेऊन ठरवले जाणार आहे. चीनच्या ६०० जणांनी मंगळावर जाण्यासाठी अर्ज केले आहेत.
चीनला भारताची भीती
चीनची सध्या तरी कुठलीच मंगळ मोहिम दृष्टिपथात नाही पण भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने मात्र मंगळाच्या दिशेने यान पाठवण्याचे ठरवले आहे. ऑक्टोबरमध्ये ही मोहिम राबवली जाणार आहे, त्यामुळे मंगळावर स्वारी करणारा भारत हा आशियातील पहिला देश ठरणार आहे. भारताच्या मार्स ऑरबायटर मोहिमेत पाच प्रायोगिक पेलोड नेले जाणार आहेत
मोहिमेची वैशिष्टय़े
मार्स वन मोहिमेत भरपूर पैसा ओतण्यात आला आहे. त्यात चांद्र मोहिमा, अंतराळ स्थानक उभारणे व तीन टप्प्यातील मंगळ मोहिमा राबवणे अशी कार्यक्रमांची रेलचेल आहे. हे सगळे २०३० पर्यंत साध्य केले जाणार आहे. मार्सवन या मंगळ मोहिमेत दूर संवेदन, मंगळावर अलगद उतरणे, मंगळभूमीचा शोध घेणे, नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणणे ही उद्दिष्टे आहेत
मंगळवारीचे स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणू असा आम्हाला विश्वास वाटतो. या मोहिमेसाठी पाच लाख अर्ज येतील अशी अपेक्षा आहे.
बॅस लॅन्सडोर्प
मार्सवन प्रकल्पाचे सहसंस्थापक