लेबर पक्षाच्या नेतृत्वपदाच्या निवडणुकीत ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी दाखल न केल्याने पक्षाचे नेतृत्व करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. लेबर पक्षाच्या बैठकीत गिलार्ड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षात अंतर्गत धुसफूस असल्याने गिलार्ड यांनी नेतृत्वपदासाठी निवडणूक घेण्याची नाटय़पूर्ण घोषणा केली होती. सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अल्पमतातील सरकारचे नेतृत्व करण्यासाठी माजी नेते केव्हीन रूड यांचा मार्ग मोकळा करावा, अशी सूचना ज्येष्ठ मंत्री सायमन क्रीन यांनी केल्याने गिलार्ड यांनी नेतृत्वाची निवडणूक घेऊन सर्वासाठी मार्ग मोकळा केला होता. रूड यांनी उमेदवारी दाखल न केल्याने लेबर पक्षाच्या नेत्या म्हणून  शिक्कामोर्तब झाले असल्याचे गिलार्ड म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gillard again leader of labour party