उत्तराखंडला बसलेल्या महापुराच्या तडाख्यात अनेक यात्रेकरूंचे बळी गेले, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, त्या पाश्र्वभूमीवर राजकीय आणि बिगर राजकीय पक्ष आणि गटांनी इफ्तार पाटर्य़ा टाळ्याव्यात, असे आवाहन अजमेर दग्र्याचे प्रमुख झैनुल अबेदिन अली खान यांनी केले आहे. उत्तराखंडला बसलेला तडाखा ही देशातील मोठी शोकांतिका असल्याने सार्वजनिक इफ्तार पाटर्य़ा टाळणे उचित ठरेल. अशा पाटर्य़ावर लाखो रुपये खर्च केले जातात. ती रक्कम पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वापरता येईल, असेही खान यांनी म्हटले आहे. त्या रकमेचा वापर पूरग्रस्तांच्या, पीडितांच्या पुनर्वसनासाठी केल्यास ती मानवतेची सेवा आहे, असे खान म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jul 2013 रोजी प्रकाशित
इफ्तार पाटर्य़ा टाळून उत्तराखंड पीडितांना मदत करा!
उत्तराखंडला बसलेल्या महापुराच्या तडाख्यात अनेक यात्रेकरूंचे बळी गेले, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, त्या पाश्र्वभूमीवर राजकीय आणि बिगर राजकीय पक्ष
First published on: 28-07-2013 at 05:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Help uttarakhand suffering people instead spending on iftar parties