इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पॅलेस्टिनमधील सरकारला थेट इशारा दिला आहे. पॅलेस्टिन प्रशासनाने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात हमासचा सहभाग नसल्याचा दावा केला आहे. यानंतर बेंजामिन नेतान्याहू यांनी हा थेट इशारा दिला. यात त्यांनी हमासचा खात्मा केल्यानंतर इस्रायल गाझातील प्रशासनाला दहशतवादाला पाठिंबा देऊन देणार नाही, असं सुनावलं आहे. नेतान्याहू यांनी रविवारी (१९ नोव्हेंबर) एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ निवेदन जारी करत भूमिका स्पष्ट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, “मी हे अगदी स्पष्ट करू इच्छितो की, आम्ही हमासचा खात्मा केल्यानंतर गाझात जे प्रशासन चालवत आहेत त्यांना आम्ही दहशतवादाला पाठिंबा देऊ देणार नाही.”

“आम्ही हमासचा पराभव केल्यानंतर गाझात…”

“सध्या पॅलेस्टिनचं स्थानिक प्रशासन दहशतवादी कृत्य होत असल्याला नकार देतं, दहशतवाद्यांना पाठिंबा देतं, दहशतवाद्यांच्या मुलांना दहशतवादासाठी आणि इस्रायलला उद्ध्वस्त करण्यासाठी प्रशिक्षित करतं. आम्ही हमासचा पराभव केल्यानंतर गाझात हे होऊ देणार नाही,” असा इशारा बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला.

हेही वाचा : हमासच्या खात्म्यानंतर गाझाचं सरकार कोण चालवणार? इस्रायलच्या राजदुतांचं मोठं विधान, म्हणाले…

“पॅलेस्टिनच्या परराष्ट्र खात्याकडून धक्कादायक दावे”

“पॅलेस्टिनचं परराष्ट्र खातं धक्कादायक दावे करत आहे. यात ते इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात हमासचा सहभाग नसल्याचा दावा करत आहेत. पॅलेस्टिनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांनीही इस्रायलवरील हल्ल्यात हमासचा सहभाग नसल्याचा दावा केला आहे. युद्धाला ४४ दिवस दिवस झाले, तरीही पॅलेस्टिनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास (अबू माझेन) इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध करण्यास नकार देत आहेत. नरसंहार झाला नसल्याचा दावा करणारे अब्बास हमास-आयसिसने नरसंहार केला नसल्याचा दावा करत आहेत,” असंही नेतान्याहू यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel pm netanyahu warn palestine over hamas attack pbs