आपल्या राजवटीत एका न्यायाधीशाला अटक करून डांबून ठेवल्याप्रकरणी मालदिवचे माजी अध्यक्ष महम्मद नाशीद यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली असून बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
याआधी दोन पकड वॉरन्ट त्यांच्यावर बजाविण्यात आली होती. पण ती टाळण्यासाठी त्यांनी गेले ११ दिवस भारतीय दूतावासात आश्रय घेतला होता. मंगळवारी ते दूतावासातून बाहेर पडताच त्यांना अटक झाली.
आपली अटक हा राजकीय कट असल्याचा आरोप नाशीद यांनी केला आहे. त्यांच्या अटकेनंतर मालदिवमध्ये हिंसाचार उसळला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 06-03-2013 at 01:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maldives ex president nasheed arrested