मनाली येथे पर्यटनासाठी आलेल्या एका ३० वर्षीय अमेरिकी महिलेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनाली येथील एका महत्वाच्या रिसॉर्टवर दोन व्यक्तींनी या पर्यटक महिलेवर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी मनालीमध्ये आलेली पीडित महिला तिच्या मित्रांना भेटण्यासाठी जुन्या वशिष्ठ भागात गेली होती. रात्री उशिरा परत येत असताना ज्या वाहनाकडे तिने लिफ्ट मागितली त्या वाहनातील दोन व्यक्तींनीच तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिस म्हणाले.
पीडित महिलेने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या दोन व्यक्तींनी तिच्यावर बलात्कार केला व तिचा आयफोन आणि पैसेदेखील काढून घेतले. ते दोघे १८ ते २५ वयोगटातील असल्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक आर. जामवाल यांनी सांगितले.