शाकाहारी बर्गरऐवजी मांसाहारी बर्गर दिल्याबद्दल ग्राहकाला १५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश ग्राहक मंचाने ‘फास्ट फूड जायंट’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या मॅकडोनाल्डला दिला.शाकाहारी बर्गरऐवजी मांसाहारी बर्गर देणे हा बर्गर पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा आहे, त्याची वर्तणूक सेवेतील कमतरता या सदरात मोडते, असे ग्राहक निवारण कक्षाने म्हटले आहे.
ग्राहकाने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ग्राहक निवारण कक्षाने सदर ग्राहकाला नुकसानभरपाईपोटी १० हजार रुपये आणि न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यापोटी आलेला खर्च म्हणून पाच हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये देण्याचे आदेश मॅकडोनाल्डला दिले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2013 रोजी प्रकाशित
मॅकडोनाल्डला बर्गर महाग पडला ; चुकीची सेवा दिल्याने १५ हजारांचा दंड
शाकाहारी बर्गरऐवजी मांसाहारी बर्गर दिल्याबद्दल ग्राहकाला १५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश ग्राहक मंचाने ‘फास्ट फूड जायंट’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या मॅकडोनाल्डला दिला.शाकाहारी बर्गरऐवजी मांसाहारी बर्गर देणे हा बर्गर पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा आहे,
First published on: 02-02-2013 at 02:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mcdonalds to pay rs 15000 for delivering wrong burger