व्यावसायिक पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी कल्पक असणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी व्यक्त केली. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या ४५ व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते.
प्रसारमाध्यमांची भूमिका गेल्या काही वर्षांत आमूलाग्र बदलली आहे. त्याच वेळी माहिती संकलनाचे-बातम्या जाणून घेण्याचे लोकांचे मार्गही तंत्रज्ञानामुळे बदलत आहेत. त्यामुळे उदयोन्मुख पत्रकारांनी या सगळ्याचे भान राखत कल्पक असणे गरजेचे आहे, असे आवाहन तिवारी यांनी केले.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन या संस्थेला ‘राष्ट्रीय दृष्टय़ा महत्त्वाची संस्था’ हा दर्जा देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचे मनीष तिवारी यांनी नमूद केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 16-01-2013 at 04:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New journalist should be innovative