वैचारिकतेचे व्यासपीठ अशी ओळख असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर, तर संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सरकारी योजनांचे मार्केटिंग सुरू केले आहे.
या निवडणुकीत कोणतेही छापील पोस्टर वापरण्यास बंदी असते. त्यामुळे हाताने  फलक रंगविण्यात येतात. विविध विभागांच्या भिंतींवर चे गव्हेरा यांच्यापासून ते विवेकानंद अवतरले आहेत. अभाविपने पोस्टरबाजीत मोदी सरकारच्या आतंरराष्ट्रीय योग दिवस, स्वच्छ भारत, बेटी बचाओ-बेटी पढाओ या योजनांचा प्रचार सुरू केला आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये होणारे मानवी हक्कांचे उल्लंघन, गुजरात दंगल, सरकारचे कामगार विरोधी आयसा, एआयएसएफने अधोरेखित केले आहे.
येत्या ११ सप्टेंबर रोजी जेएनयू व दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाची निवडणूक होणार आहे. जेएनयूमध्ये जातीय व प्रांतिक समीकरणांना फारसे महत्त्व नसले तरी दिल्ली विद्यापीठात त्यास अपवाद आहे. काँग्रेसप्रणीत एसएनयूआयने तब्बल सहा वर्षांनंतर जाट-गुर्जर समीकरण सांभाळले आहे. २००९ नंतर एनएसयूआयने एकदाही पंजाबी विद्यार्थ्यांस उमेदवारी दिली नव्हती. यंदा मात्र पंजाबी विद्यार्थ्यांनी एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांकडे तशी मागणी केली होती.