राज्यसभेत मंगळवारी बाल गुन्हेगार न्याय विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकातील तरतुदीनुसार आता बालगुन्हेगारीची वयोमर्यादा १८ वरून १६ वर आणण्यात आली आहे. देशाला हादरवून टाकणाऱ्या ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेनंतर या विधेयकात सुधारणा करण्याची मागणी करण्यात येत होती. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यसभेत प्रलंबित असलेल्या अल्पवयीन न्याय सुधारणा विधेयकावरील चर्चेला मंगळवारी राज्यसभेत सुरुवात झाली. त्यानंतर डाव्या पक्षांचा विरोध वगळता अन्य पक्षांच्या सहमतीने बाल गुन्हेगार न्याय विधेयक मंजूर करण्यात आले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-12-2015 at 19:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya sabha passes juvenile justice bill with jyoti parents present in house