उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी सर्जेराव निमसे यांची लखनौ विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक केली आहे. निमसे हे सध्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. निमसे यांनी १९८२ मध्ये गणितात पीएच.डी. मिळवली. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९५० रोजी झाला. त्यांनी पदवी व पदव्युत्तर वर्गाना गणित शिकवले असून गेली ३४ वर्षे ते अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यांनी एकूण १२ पुस्तके लिहिली असून त्यांचे १२ शोधनिबंधही प्रकाशित झाले आहेत. सध्याचे कुलगुरू असलेले निवृत्त आयएएस अधिकारी जी.बी.पटनायक हे येत्या दोन मे रोजी निवृत्त होत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2013 रोजी प्रकाशित
लखनौ विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सर्जेराव निमसे
उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी सर्जेराव निमसे यांची लखनौ विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक केली आहे. निमसे हे सध्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. निमसे यांनी १९८२ मध्ये गणितात पीएच.डी. मिळवली. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९५० रोजी झाला.
First published on: 01-05-2013 at 01:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: S b nimse appointed vice chancellor of lucknow university