सौदी अरेबियातील मक्कामध्ये गुरूवारी हज यात्रेदरम्यान झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ७१७ वर पोहोचला असून ७०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हज यात्रेचा आजच्या शेवटच्या दिवशी सैतानाला दगड मारण्याची प्रथासाठी लाखोंचा जनसमुदाय या परिसरात जमा झाल्याने ही चेंगरचेंगरी झाल्याचे सौदी अरेबियाच्या वृत्तसंस्थांनी दिली आहे.
मुस्लिम धर्मीयांसाठी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱया या हज यात्रेच्या शेवटच्या दिवशी सैतानाला दगड मारण्याच्या प्रथेसाठी सुमारे २० लाखांहून अधिक भाविक मक्का येथील मशिदीत उपस्थित होते. भारतातून दीड लाख मुस्लीम बांधव हज यात्रेसाठी सौदीमध्ये गेले आहेत. मात्र, चेंगराचेंगरीतील मृतांमध्ये भारतीयांच्या समावेशाबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
वाईट प्रवृत्तींचा नाश होवो, अशी संकल्पना असलेल्या या पारंपारिक प्रथेत मुस्लिम बांधव मक्केतील मुख्य मशिदीबाहेर एकत्र जमून सैतानाला दगड मारण्याची प्रथा पार पाडतात. यासाठी मुख्य मशिदीच्या बाहेर लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव जमलेले असताना मौंट अराफत आणि मुख्य मशिदीदरम्यानच्या परिसरात अचानक धावाधाव आणि चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. चेंगराचेंगरी इतकी भीषण होती की त्यात आतापर्यंत ७१७ जणांचा मृत्यू झाल्याचे तेथील नागरी सुरक्षा अधिकाऱयाने सांगितले आहे. सौदी प्रशासनाच्या बचाव पथकांकडून घटनास्थळी युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे. मात्र, मृतांचा खच, नातेवाईकांचा आक्रोश आणि आपल्या कुटुंबियाचा शोध घेण्यासाठी सुरू असलेली लोकांची धावाधाव यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. यासगळ्यामुळे बचाव पथकालाही मदत कार्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, जगातील सर्वात मोठी मशिद अशी ख्याती पावलेल्या मक्का येथील अल्र-हरम मशिदीत दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या क्रेनच्या अपघातात १११ जणांचा मृत्यू तर, ३५० हून अधिक जण जखमी झाले होते. मृत्यूमुखींमध्ये दोन भारतीयांचाही समावेश होता. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही सौदी अधिकाऱय़ांनी दिले आणि तपासातून समोर येणारी माहिती सौदीच्या राजाला देण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. यापूर्वी या परिसरात २००४, २००६ साली झालेल्या चेंगराचेंगरीत अनुक्रमे २५१ आणि ३४६ जणांचा मृत्यू झाला होता.
At least 220 pilgrims were martyred and 500 injured in stampede during stoning jammrat #Mecca 🙁 pic.twitter.com/TOyGg5fNC2#تدافع_مشعر_مني
— سید فیاض علی #TeamIK (@IamTeamIK) September 24, 2015