हरयाणातील पलवल स्थानकाजवळ दोन रेल्वे गाड्या समोरासमोर धडकल्या. अपघातात एक मोटरमन ठार झाला असून शंभरहून अधिक जण झाले आहेत. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबईहून हरिद्वारला जाणाऱया लोकमान्य टिळक एक्स्पेसला ईएमयूने समोरून जोरदार धडक दिली.  धडक इतकी तीव्र होती की दोन्ही रेल्वे गाड्यांच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला आहे. रेल्वे अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनास्थळी रेल्वेचे बचावपथक दाखल झाले असून युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू आहे.