उत्तराखंडमधील भीषण पुरामुळे गावेच्या गावे वाहून गेली आहेत. रस्ते, पूल आणि दळणवळणाचे सर्व मार्गही खचले आहेत. केदारनाथ तीर्थक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मृतांची नेमकी संख्या अजूनही सांगता येत नाही. या आपत्तीचा फटका किती आहे हे कळायलाच काही महिने लागणार आहेत. या उत्त्पातात सर्वस्व गमावूनही आपलं जगणं सावरू पाहाणाऱ्या मनांना आधाराचा एक सेतु म्हणून ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्र-समूहाने एक मदतनिधी स्थापन केला आहे.
एक्स्प्रेस सिटिझन्स रिलीफ फंड
या निधीसाठी दिल्या जाणाऱ्या देणग्यांना ८० जी कलमानुसार प्राप्तीकरातून सूट मिळणार आहे. कृपया देणगीसोबत आपला पिनकोडसह पूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि पॅन क्रमांक पाठवावा म्हणजे आम्हाला तुमचे करसवलत प्रमाणपत्र पाठविता येईल. तेथील जनजीवन पूर्वपदावर आणण्यात तुमच्या देणगीचाही कसा वाटा आहे, हे आम्ही वेळोवेळी तुम्हाला कळवू.
कृपया आपले धनादेश खालील पत्त्यावर पाठवावेत:
द इंडियन एक्स्प्रेस सिटिझन्स रिलीफ फंड,
द इंडियन एक्स्प्रेस,
एक्स्प्रेस बिल्डिंग,
९ व १० बहाद्दूरशाह जफर मार्ग,
नवी दिल्ली ११० ००२.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarakhand fund the indian express citizens initiative