आकाशात तब्बल हजार फूट उंचीवर उडणारे ‘एमिरेट्सचे ए३८०’चे प्रवासी विमान आणि या विमानाशी बरोबरी साधण्याचा स्टंट करणारे दोन ‘जेटमॅन’, असे हे चित्तथरारक दृश्य दुबईच्या आकाशात पाहायला मिळाले.
येव्ह रोसी आणि विन्स रिफेट या सुप्रसिद्ध जेटमॅनसोबत दुबईच्या आकाशात ‘एमिरेट्स’ कंपनीच्या साहाय्याने अतिशय काळजीपूर्वक हा स्टंट करण्यात आला असून दोघेही जेटमॅन प्रवासी विमानाच्या बरोबरीने आकाशात स्वच्छंदी फेरफटका मारताना व्हिडिओत दिसून येतात. विमानाच्या दोन पंखांच्या अगदी जवळ जाऊन दोघा जेस्टमॅन्सने बरोबरी साधलेले दृश्य तर मनाचा ठाव घेणारे आहे. ‘एक्सदुबई’ या अॅक्शन स्पॉर्ट्स कंपनीने हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला असून त्यास ४ लाखांहून अधिक जणांची पसंती मिळाली आहे.